खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली.
लोकसत्ता विश्लेषण: राष्ट्रवादीत वादावादीस कारणीभूत ठरलेलं नथुराम गोडसे प्रकरण आहे तरी काय?
नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे असेही जयंत पाटील म्हणाले. “हा सिनेमा आणि त्यांची भूमिका मी पाहिलेली नाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदर अमोल कोल्हे यांनी ही भूमिका केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहित नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले.
अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी २०१७ साली ती भूमिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचं कर्तृत्व घराघऱात पोहोचवण्याचं कामही अमोल कोल्हे यांनीच केलं आहे. शेवटी कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका पार पाडली आहे. २०१९ मध्ये आम्ही त्यांना पक्षात घेतलं आणि लोकसभेला उभं केलं. लोकांनीदेखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून आणलं. लोकसभेतही ते अतिशय चांगलं काम करत आहेत. बैलगाड्या शर्यत तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचेच विचार सभागृहात मांडले आहेत. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्यांनी आधी काही भूमिका केली असेल तर आज त्यासंबंधी दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
अमोल कोल्हेंना विरोध करणार म्हणणाऱ्या आव्हाडांबद्दल शरद पवार म्हणतात; “त्यांचं…”
तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही, आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.