Nawab Malik ED Inquiry : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतंं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.
तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. या ठिकाणी दोन तासांपासून युक्तिवाद सुरू होता. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी कऱण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आठ दिवसांचीच कोठडी मंजूर केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. कार्यकर्त्यांनी केंद्रसरकरच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. ''गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से, केंद्र सरकार जब, जब डरती है ईडी को आगे करती है!'' अशा घोषणा देत भाजपावर निशाणा साधला गेला आहे.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कडून अटक करण्यात आल्याने, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केलं आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं आहे. या ठिकाणी दोन तासांपासून युक्तिवाद सुरू आहे. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी कऱण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासही पक्षाचे काही अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं आहे. या ठिकाणी जवळपास तासभरापासून सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नवाब मलिकांबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, याची सर्वांनी उत्सुकता आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आपण कुणासमोर झुकणार नसल्याचं म्हटलं आहे. “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अल्पसंख्यामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ईडी कडून आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिलव्हर ओक येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
मला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं तिथं समन्सवर सही करण्यास सांगितलं, असं नवाब मलिक यांनी न्यायालयात सांगितलं आहे.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना विशेष न्यायालयात आणलं गेलं आहे. या ठिकीणी ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करणार आहेत. अनिल सिंह कोर्टात हाजर झाले असून, बचावपक्षाचे वकिलही उपस्थित आहेत. नवाब मलिकांतर्फे कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना विशेष न्यायालयात आणलं गेलं आहे. या ठिकीणी ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करणार आहेत. अनिल सिंह कोर्टात हाजर झाले असून, बचावपक्षाचे वकिलही उपस्थित आहेत. नवाब मलिकांतर्फे कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
“नवाब मालिकांनी विचारलेले प्रश्न भाजपाच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याविरोधात ED ची कारवाई. अशा प्रकारच राजकारण या देशात कधीही झालं नाही, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण ते यशस्वी होणार नाही.” असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून एनसीपी आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
“अनिल देशमुख यांच्यानंतर मलिक आणि नंतर अनिल परब. उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. ” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
''अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,” दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर अशी प्रतिक्रिया दिली.
मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ईडीने अल्पसंख्याकमंत्री नवाब मेल्क यांना अटक केली आहे.
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना जवळपास आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
आठ तासांच्या चौकशीनंतर अखेर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आहेत. मलिक कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. नवाब मलिकांना जेजे रूग्णालयाकडे नेण्यात आलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई करत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन घेतल्याचे प्रकरण १७ वर्षानंतर जर बाहेर काढले जात असेल तर न्यायाधीशांकडूनही हा प्रश्न विचारला जाईल. न्यायालय तपास अधिकाऱ्यांचे कान धरतील, असेही माजिद मेमन यावेळी म्हणाले.
नवाब मलिक यांची सात तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. तर कार्यालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत. राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस दलासोबतच आता ईडी कार्यालयाबाहेर सीआरीपीएफची तुकडी देखील दाखल झालेली आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सकाळी ७ वाजल्नयापासून ईडी कार्यालायात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. तर ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या देऊन बसलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
''मोदी सरकारचा वेताळ नवाब मलिक यांच्या मागे येणार हे माहितच होते. मविआ सरकार बदनाम करुन पाडण्याची सुपारी यंत्रणांना दिली आहे. देशात पुतीन मॉडेल चालू आहे. सत्तेसाठी केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करणारी भाजपा पिसाळली आहे. या विरोधात एकत्र येऊन लढूच पण जनतेने डोळे उघडून हे पहावे.'' अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली गेली आहे.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रीपद गमवल्यापासून देवेंद्र फडणवीस व भाजपाकडून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. मग कायदेशी, बेकायदेशीर अथवा कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची त्यांची तयारी आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
“केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”अशा शब्दांमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली गेली आहे.
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. जवळपास सहा तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्वीट करण्यात आलं आहे. “जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के गलीयों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंक्लाब के नारो से...” असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे.
“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.” असं म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
“केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे हे निंदनीय आहे. यातून संविधान व लोकशाही विरोधी काम होते.” अशा शब्दांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिकांवर ईडी करून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“नवाब मलिक यांची कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, की अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राहू शकते का? याबाबत जरा तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या माफियाखोरांना मदतच करत असतात.” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.