मुंबई: राज्यात महाविकास आघाडी (मविआ) एकसंध ठेवणे ही तीन पक्षाची प्राथमिकता असून लोकसभा अथवा विधानसभा निवडणूकीमध्ये विजयाची शक्यता पाहून मतदारनिहाय जागावाटपाचे सूत्र ठरवावे. जागा वाटपाच्या बाबतीत राष्ट्रवादीची व्यावहारिक भूमिका आहे, अशी  टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दि इंडियन एक्सप्रेस’च्या ‘टाऊनहॉल’ या कार्यक्रमात तटकरे सहभागी झाले होते.  प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती भिन्न असते. राजकीय समीकरणे वेगळीवेगळी असतात. त्यामुळे जिंकण्याची क्षमता असणारा उमेदावर नजरेसमोर ठेवून आपणास राजकीय डावपेच आखावे लागतात. शेवटी  आकडे महत्वाचे असतात. त्यामुळे प्रसंगी एक पाऊल मागे येत समजूतदारपणा दाखवावा लागतो. आज आमच्यापुढे मविआला अधिक बळकट करणे, ही प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात व्हावी, अशी अपेक्षा तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल बोलताना तटकरे यांनी पवार यांच्या क्षमतेचा वारंवार उल्लेख केला. अजित पवार यांना राज्यात लोकांचा वाढता पाठींबा मिळत असून राष्ट्रवादीचे राज्यात मजबूत संघटन आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात संशयाचे मळभ निर्माण करण्याचे काम सूरू आहे. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून होत नाही मात्र पक्षाबाहेरून हे काम सुरू आहे, असा आरोपही तटकरे यांनी केला.मात्र यांसदर्भात कोणाच्या नावाचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही.

‘वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत’ मविआचा शत्रू कोण असून कोणाबरोबर लढायचे आहे, हे आपण ओळखले पाहिजे. त्यामुळे मविआमध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्ये नेत्यांनी टाळावीत. कोणत्याही नेत्यांच्या वक्तव्याने मविआमध्ये तणाव न्र्मिाण होईल,अशी विधाने टाळावित. संजय राऊत यांचे ‘सामना’तील लेख अथवा कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली वक्तव्ये टाळली पाहिजेत, अन्यथा आपण विद्यमान सरकार विरोधात कसे उभे राहणार? असा सवाल तटकरे यांनी यावेळी केला.