राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. गेली अडीच वर्ष नगरविकास खात्याचे मंत्री असताना हे काम का केलं नाही? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

“येत्या दोन वर्षात मुंबई शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करु अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण अडीच वर्ष नगरविकास विभागाचे मंत्री होतात. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते. त्यावेळी मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त का नाही केले? हा प्रश्न मुंबईच्या नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे,” असं महेश तपासे म्हणाले आहेत.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त!; मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांची ग्वाही

“खड्डेमुक्तीची घोषणा करता याचा अर्थ असा आहे की, गेल्या अडीच वर्षामध्ये नगरविकास खात्याचे मंत्री होतात, त्या कार्यकाळामध्ये मुंबई शहरासाठी, रस्त्यांसाठी काही झालं नाही का? ही त्याची कबुली आहे का अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईतील रस्त्यांची कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. त्या वेळी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीक्षणाचा खर्चदेखील कमी होतो. त्यामुळे मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत. मुंबईत आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचेही टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे.

२०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे, तर आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणदेखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.

Story img Loader