कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच येत्या ५ ऑगस्ट रोजी दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील द्वंद्व आणखीनच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणे आणि दीपक केसरकरांमध्येही चांगलेच वाकयुद्ध रंगलेले पहायला मिळत होते.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नारायण राणेंविरूद्ध बंड केल्यानंतर दीपक केसरकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राणेंचा मुलगा निलेश राणे यांच्या पराभवात केसरकरांनी सिंहाचा वाटा उचलला होता.

Story img Loader