Jitendra Awhad on Manipur Women’s Violence Video : मणिपूरमध्ये जमावाने महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली, शरीराची विटंबना केली आणि सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. यानंतर मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही दखल घेतली. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. तसेच या घटनेवरून गाईला आई मानणाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बाईची नग्न धिंड काढली देश शांत, गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असता. गाईला आई मानणारे, बाईला आई बहीण मानायला तयार नाहीत. मनुस्मृती.”

हेही वाचा : आधी नग्न करत धिंड काढली, मग सामूहिक बलात्कार; मणिपूरमधील पीडितेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

“मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराने क्रूरतेच्या सीमा पार केल्या”

दरम्यान, याआधीही जितेंद्र आव्हाडांनी मणिपूरमधील घटनेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “मणिपूर येथील हिंसाचाराचे आणि महिलांसोबतच्या दुष्कृत्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ते पोस्ट करण्यासारखेदेखील नाहीत. कुकी आणि मैथई समाजात सुरू असणाऱ्या हिंसाचाराने अत्यंत भयाण स्तर गाठला असून महिलांवरील अत्याचाराने येथे क्रूरतेच्या सीमा पार केल्या आहेत.”

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का?”

“हे सर्व बघून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का? देशात महिला व बालविकास मंत्रालय काय करत आहे? देशात असणारा महिला आयोग याची दखल घेणार आहे का? मणिपूरच्या सद्यस्थितीबद्दल देशाचे पंतप्रधान एक अवाक्षर तरी काढणार आहेत का? असे प्रश्न पडत आहेत,” असं म्हटलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awhad comment on manipur viral video mention manusmriti pbs