ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती सूचवली. ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा निर्णय जाहीर केला आहे.

“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Thane district Pipani trumpet election symbol NCP Sharad Pawar
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?

हेही वाचा : अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले…!

“गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो,” असं शरद पवारांनी नमूद केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवार यांनी जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. ‘महाराष्ट्रचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार…’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन विनवणी केली.

हेही वाचा : शरद पवारांच्या निवृत्तीनंतर भावनिक कार्यकर्ते आक्रमक, अजित पवार संतापले, म्हणाले, “ये गप रे, तुलाच…”

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेली ६० वर्षे कार्यकर्त्याच्या मनात काय, हे बघणारे जादूगर आहात. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला.”

“पण, तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. आमचं जीवनच तुम्ही आहात. एवढ्या अडचणी असताना कोणाकडं जायचं?,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले.