केंद्र सरकारने सवलतीच्या सिलिंडरची मर्यादा सहावरून नऊ केली असताना संयुक्त कुटुंबासाठी १२ सवलतीचे सिलिंडर मिळावेत आणि शेतकऱ्यांना सवलतीमध्ये डिझेल मिळावे, अशा मागण्या करीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा, सवलतीच्या सिलिंडरबाबत आमचा पक्ष राज्य शासनाकडे मागणी करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या सहापर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताच, ही मर्यादा वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. आता सवलतीच्या दरातील सिलिंडरची मर्यादा सहावरून नऊपर्यंत वाढविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मागणी पुढे केली असून ही मर्यादा १२ पर्यंत वाढवावी अशी मागणी केली आहे.

Story img Loader