आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाने पहिल्या फळीतील सर्व नेत्यांकडे जबाबदारी सोपविली असली तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातील मानल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीने आतापासूनच गांभीर्याने घेतल्या आहेत. यासाठीच पक्षाच्या पहिल्या फळीतील साऱ्या नेत्यांकडे जिल्ह्य़ांची जबाबदारी सोपविण्यात आली. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, गणेश नाईक, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव या साऱ्या नेत्यांकडे विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश युवकचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांचाही नेतेमंडळींच्या यादीत समावेश आहे. वादग्रस्त आमदार अशी प्रतिमा असलेल्या आव्हाड यांना मात्र नेतेमंडळींच्या यादीत स्थान मिळालेले नाही. जबाबदारीचे वाटप करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आव्हाड यांना चार हात लांबच ठेवल्याची पक्षात चर्चा आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून झालेल्या वादानंतर आव्हाड यांना धमक्या देण्यात आल्या असता स्वत: पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आव्हाड यांचा ओबीसी समाजातील लोकप्रिय आणि सुविद्य नेते असल्याचा उल्लेख केला होता. अल्पसंख्याक समाजाची बाजू आव्हाड हे प्रभावीपणे मांडतात, असे प्रशंसोद्गार पवार यांनी काढले होते.

अजित पवार हे आव्हाडांशी फटकून वागतात, तर सुनील तटकरे यांनीही आव्हाड यांना फारसे महत्त्व दिलेले नाही. मध्यंतरी ठाण्यातील परमार बिल्डरच्या आत्महत्येप्रकरणी नजिब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे या राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना झालेल्या अटकेनंतर पक्षाने त्याची काहीच दखल न घेतल्याबद्दल आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निषेधार्थ तटकरे यांच्या ठाण्यातील दौऱ्यावर आव्हाड समर्थकांनी बहिष्कार घातला होता. शेवटी पक्षाध्यक्ष पवार यांना आव्हाड यांच्या नाराजीची दखल घ्यावी लागली होती.