NCP Chief Sharad Pawar Admitted to Breach Candy Hospital: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.

दरम्यान ३ नोव्हेंबरला शरद पवार शिर्डीला जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहिती पक्षाने दिली आहे.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात परिसरात गर्दी करु नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar admitted in breach candy hospital in mumbai sgy 87