गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचा मुद्दा चर्चेत आहे. नागरिकांनी एसी लोकलविरोधात आंदोलन केल्यानंतर मध्य रेल्वेने एक पाऊल मागे घेतलं असून, १० नव्या एसी लोकलगाड्या पूर्ववत केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकल बंद केल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शरद पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं असून, एसी लोकल बंद करण्याची मागणी केली आहे. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आज सकाळी ११ वाजता ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते ठाण्यातच असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात शरद पवार हे दिवसभर तळ ठोकून बसणार असून यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दुपारी २ वाजता त्यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शरद पवारांना एसी लोकलविरोधा जनक्षोभ निर्माण झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “एसी लोकलचा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. एसी गाड्यांमुळे नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी यांच्यावर जास्त परिणाम होतो. एक गाडी रद्द करुन हा प्रश्न सुटणार नाही. यामुळे सामान्यांच्या वेदनेत वाढ होत आहे. एसी लोकल बंद केल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन उपलब्ध केलं पाहिजे”.
‘एसी लोकल’ चालवणं म्हणजे बोटं खाऊन पोट भरणं! त्यापेक्षा…
“सामान्यांच्या यातन कमी कऱण्यासाठी नागरिकांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर देशपातळीवर रेल्वेच्या प्रमुखांसोबत बैठक घेत, त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडू,” असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आक्रमक होत आंदोलन केलं. साध्या लोकल रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे हे प्रवासी आक्रमक झाले होते. या प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल अडवून ठेवली. आधी यावेळी सुटणारी ही लोकल साधी होती. यातून हे प्रवासी प्रवास करत होते. आता तीच एसी लोकल झाल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी जवळपास तासभर ही लोकल थांबवून ठेवली होती. बदलापूर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आलं होतं.
सामान्य लोकलच्या दहा फेऱ्या पूर्ववत
सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास प्रवाशांच्या वाढत्या विरोधानंतर मध्य रेल्वेने दहा वातानुकूलित फेऱ्या पुन्हा सामान्य लोकल फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. वातानुकूलित फेऱ्या या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. दहा सामान्य लोकल फेऱ्यांची अंमलबजावणी गुरुवार, २५ ऑगस्टपासून करण्यात आली आहे.
दहा फेऱ्यांच्या वेळा डाऊन मार्ग
सीएसएमटी-बदलापूर- स.९.०९ वा
सीएसएमटी-कल्याण-दु.१२.२५ वा
सीएसएमटी-ठाणे-दु. ३.०२ वा
सीएसएमटी-बदलापूर-सायं.५.२२ वा
सीएसएमटी-ठाणे-रा.८.३० वा
अप मार्ग
ठाणे-सीएसएमटी-स.८.२० वा
बदलापूर-सीएसएमटी-स.१०.४२ वा
कल्याण-सीएसएमटी-दु.१.३६ वा
ठाणे-सीएसएमटी-सायं.४.१२ वा
बदलापूर-सीएसएमटी-सायं.६.५५ वा