चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून महाराष्ट्रातही सत्ता आणण्याबद्दल जाहीर भाष्य करु लागले आहेत. उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्राचा क्रमांक असल्याच्या घोषणाही भाजपा नेते देऊ लागले आहेत. दरम्यान राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.

“महाराष्ट्रातही आपला भगवा….”; फडणवीसांच्या उपस्थितीत नितीन गडकरींचं मोठं विधान

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका

महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले “ज्या क्षणी…”

गुरुवारी नागपुरात आयोजित सत्कार समारंभात बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात २०२४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता येईल असा दावा केला. यानंतर शरद पवार यांनी या दाव्यावर उत्तर दिलं असून राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान केलं आहे. विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

PHOTOS: फडणवीसांचा रोड शो थेट गडकरींच्या घरापर्यंत; म्हणाले “एकहाती सत्ता आणणार”; गडकरी म्हणाले “कामाला लागा”

शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी दोन बैठका झाल्या. सकाळी महाविकास आघाडीचे तरुण आमदार पवार यांना भेटले व सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. शरद पवार यांना भेटणाऱ्या आमदारांमध्ये रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांचा समावेश होता. जवळपास दोन तास ही बैठक चालली. यावेळी पवारांनी युवा आमदारांची मते जाणून घेतली आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी कानमंत्रही दिला.

नितीन गडकरींकडून फडणवीसांचं अभिनंदन; म्हणाले “गोव्यात पर्रीकर असतानाही आम्हाला इतक्या…”

“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. महत्वाचं म्हणजे भाजपा आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधिमंडळातही आक्रमक उत्तर

सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमकपणे उत्तरे देण्याचा निर्णय झाला. मलिक यांच्याकडे सध्या दोन जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद आहे. गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनुपरे यांच्याकडे तर परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मलिक यांच्याकडील कौशल्य विकास खाते राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक खाते हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले जाईल. फडणवीस यांनी २०२४ नंतर सत्तेत येऊ, असे सांगितले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे सरकार २०२४ पर्यंत राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Story img Loader