सिंचन घोटाळ्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच धोबीपछाड दिल्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘म्हाडा’ घरांच्या किंमतींवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. घरांच्या किंमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष घालतील, असा विश्वास व्यक्त करीत घरांच्या वाढत्या किंमतीबाबत मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. ‘मेट्रो’ चाचण्यांचे नाटक पुरे झाले आता ही रेल्वे लवकर धावेल याकडे लक्ष द्या, असा सल्लाही राष्ट्रवादीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना दिला. ‘म्हाडा’ घरांच्या किंमती जास्त असल्याबद्दल टीका केली जात आहे. गृहनिर्माण खाते काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीला टीकेची आयतीच संधी मिळाली. घरांच्या किंमती कमी व्हाव्यात, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यावर टीका
सिंचन घोटाळ्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच धोबीपछाड दिल्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘म्हाडा’ घरांच्या किंमतींवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही.
First published on: 03-05-2013 at 03:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp targets prithviraj chavan on expensive mhada flats