अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. सत्तारांच्या विधानाचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तसेच अब्दुल सत्तारांसह शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाल्याचे बघायला मिळाले. या मोर्चात राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यास इतर महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

भाजपाच्या महिला नेत्याने राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळतो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला झाला आहे. जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, आज आम्ही आंदोलन करत असताना आम्हालाही पोलिसांनी बाजुला केलं. म्हणून त्यांच्यावर वियनभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिल्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad Court: गर्दीत विनयभंग कसा होऊ शकतो? जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांचा प्रश्न, न्यायाधीशांना दाखवला व्हिडीओ

नेमकं काय बोलले होते अब्दुल सत्तार?

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये आज एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता. सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भि** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp women volunteer march on ministry against abdul sattar statement on supriya sule spb