Supriya Sule on Ladki Bahin Scheme: “लोकसभेपर्यंत कुणालाही त्यांची बहीण आठवली नाही. निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की, बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही. ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय आणि पैसे आणायचे नसतात. व्यवसायात प्रेम नसतं. कारण तिथं प्रेम आणलं तर तोटा होईल. जर प्रेमात पैसे आणले, तर त्याला नातं म्हणत नाही. दुर्दैव आहे या सरकारचे की, त्यांना प्रेमात आणि पैशांतले अंतरच कळले नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेच्या निकालाचा हवाला दिला. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली.

nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ashwini Deshmukh
Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे लोक…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं? पत्नीने सांगितला घटनाक्रम!
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Cardiac Arrest
Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…

हे वाचा >> ‘मविआ’चा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंची घोषणा; म्हणाले, “माझा पाठिंबा…”

बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावण्याचे पाप

सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, “ते (महायुतीचे पक्ष) बोलताना म्हणतात की, एक बहीण गेली तर हरकत नाही. आपण दुसऱ्या बहिणी आणू. १५०० रुपयांमध्ये विकत घेता येईल, इतके हे नाते विकाऊ नाही. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस बहीण-भावाच्या नात्याला किंमत लावण्याचे पाप या सरकारने केले आहे. आमचे दोन वीर बंधू दोन दिवसांपूर्वी म्हणाले की, आमचे लक्ष आहे, कुठली बहीण कुठे मतदान करते. म्हणजे यांच्या पोटातलं ओठावर आलं. सत्य कधी लपत नाही.”

यावेळी सुप्रिया सुळेंनी लाडकी बहीण योजनेवरून मतदान मागणाऱ्या नेत्यांवर टीका केली. मतदान केले नाही तर लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे परत काढून घेऊ, असे विधान करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी टीकास्र सोडले. यांचे बहिणीशी नाते प्रेमाचे नसून मतांशी जोडलेलं आहे. डिसेंबरमध्ये किती बुथवर किती महिलांची मतं मिळाली, हे पाहून लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे दिले जाणार आहेत. “तुम्ही एका जरी बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवाच, मग पुढे काय करायचे ते आम्ही पाहू”, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.

हे ही वाचा >> हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारवर हिंदू जनजागृती समितीची नाराजी; देवस्थान जमिनीच्या निर्णयावर टीका

महायुती सरकार त्यांच्या गलिच्छ राजकारणात नातीही ओढतील, अशी अपेक्षा नव्हती. पण तेही त्यांनी केले, अशीही टीका त्यांनी केली. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. पण आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात लढत आहोत. तिथे अनिल परब आणि अनिल देसाई हे उत्तम कार्य करत आहेत, याबद्दल सुप्रिया सुळे यांनी या दोन नेत्यांचे कौतुक केले. लोकसभेत यश मिळवूनही आम्ही ही न्यायालयीन लढाई बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी लढत आहोत. मशाल आणि तुतारीला जनतेने आशीर्वाद दिलाच आहे, पण आम्ही ही तत्त्वांची लढाई आहे. त्यामुळे ही हक्कांची लढाई आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असे ठामपणे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Story img Loader