Meera Borwankar : दंगली अचानक घडत नसतात तर दंगली ठरवून केल्या जातात. हिंसाचाराच्या बाबतही असंच होतं असा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या हिंसाचाराच्या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी हिंसाचार कसा घडवायचा याविषयी फोनवर चर्चा केली होती असं त्यांनी म्हटलं आहे.
मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्यातलं रेकॉर्डिंग आमच्यकडे होतं. पुण्यात बंद असताना कुठे कसा हिंसाचार घडवायचा याबाबतलं हे संभाषण आहे. मात्र हे प्रकरण दाखल करुन घ्यायला आमचेच पोलीस तयार नव्हते. मलाही हे सांगण्यात आलं की तुम्हाला मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसायचं असेल तर हे प्रकरण तुम्ही दाखल करु नका.
मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे होते. मात्र तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करता आली नाही. त्यावेळी राजकीय नेत्यांविरोधात जर तुम्ही तक्रार दाखल केली तर तुम्हाला पोस्टिंग मिळणार नाही असंही त्यांनी धक्कादायक माहिती सांगितली. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मीरा बोरवणकर यांनी हा आरोप केला आहे.
नागरिकांना आणि माध्यमांनाही माहिती होते की, त्याकाळी माझ्याकडे दंगली घडवण्यात आल्याचे सबळ पुरावे माझ्याकडे होते. त्या वेळी केलेली दंगल पूर्वनियोजित होती अशीही माहिती मीरा बोरवणकर यांनी दिली.