विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि एकच खळबळ उडाली. गोऱ्हे आणि शिंदेंदरम्यान अर्धा तास चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून गोऱ्हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार की काय याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं. असं असतानाच रात्री टीव्ही-९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचं मान्य केलं. मात्र ही भेट अचानक झाल्याचं सांगतानाच नेमकं काय घडलं याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

“मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर ही भेट नेमकी कोणत्या पद्धतीची होती?” असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना विचारण्यात आला. त्यावर नीलम गोऱ्हेंनी पहिल्याच वाक्यामध्ये या भेटीचे उलट-सुलट अर्थ काढण्याची गरज नाही असं अधोरेखित केलं. “मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत,” असं सांगितलं. तसेच पुढे, “मी जेव्हा तिथे गेले तेव्हा १० व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते,” असं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

ओम प्रकाश बिर्लांकडे काय काम होतं यासंदर्भातील माहितीही नीलम गोऱ्हेंनी दिली. “मला निवेदन द्यायचं होतं, शुभेच्छा द्यायच्या होत्या. निवेदन द्यायचं होतं. तसेच काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकाणी त्यांचं पण मध्ये त्यांचं (मुख्यमंत्र्यांचं) बोलणं चाललं होतं बिर्लांसोबत. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले. त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. अशापद्धतीची जनरल भेट होती ओमप्रकाश बिर्लांबरोबर. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती,” असं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनासंदर्भात नाराजी व्यक्त केली. “असं असलं तरी अर्धा तास बंद खोलीच्या आड चर्चा वगैरे अशापद्धतीने बातम्या आल्या तर काय तुमच्याकडे आधार आहे हे कळलं तर मीही त्यावर बोलू शकेल,” असं त्या म्हणाल्या.

“शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे, याबद्दल काय सांगाल?” असा प्रश्नही नीलम गोऱ्हेंना या भेटीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आला. “तो मुळात योगायोग होता. मी जेव्हा भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते. मुख्यमंत्री होते म्हणून माझी अपॉइटमेंट वगैरे असं कोणी करत नाही. तो भाग असतो व्यवस्थेचा म्हणून ते तिथे बसलेले होते. पण कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असं नीलम गोऱ्हेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

“जे निवेदन झालं माझं त्या निवेदनाच्या आधारे बातमी पण मी दिलेली आहे. पुरातत्व विभागाने अजून सक्रीय काम करायला पाहिजे, श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील नेमले गेले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या मी केल्या होत्या ज्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्याकडून मदत हवी होती. या सगळ्या मुद्द्यावर बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही म्हणजेच महाराष्ट्र सरकारसुद्धा त्यामध्ये निश्चितपणाने पावलं उचलेल. कठोर कारवाई करु असं ते म्हणाले,” असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.

“राजकीय चर्चा म्हटलं तर शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझी तरी इच्छा पण नाही. हे तुम्हाला माहितीय. त्यामुळे माझ्याशी चर्चा न करता कारण नसताना बातम्या पसरवून माझं स्वत:चं मनोरंजन झालं बातम्यांमुळे. लोकांची सुद्धा खूप करमणूक झालेली आहे. तुम्ही माझ्याशी चर्चा केली असती, तिथून निघाल्यानंतर फोन केला असता तर जो गैरसमज पसरला तसं झालं नसतं,” असं त्यांनी सांगितलं.

Story img Loader