लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या ‘नीलकमल’ बोटीला बुधवारी झालेल्या अपघाताच्या चौकशीअंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळाने अखेर आता ‘नीलकमल’ बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. तसेच बोटीतील डेकची जबाबदारी असणाऱ्या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणाऱ्या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.
घारापुरीजवळ प्रवासी बोटीवर नौदलाची स्पीड बोट आदळून बुधवार झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जलवाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘नीलकमल’ बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने अपघात झाला. मात्र ‘नीलकमल’ बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘नीलकमल’ बोटीची प्रवासी क्षमता ८० प्रवासी आणि सहा कर्मचारी अशी होती. असे असताना या बोटीवर अपघातादरम्यान एकूण ११० प्रवासी आणि ५ कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असल्याने नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र बुधवारी निलंबित करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही बोटीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी ही तिन्ही प्रमाणपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. ही तिन्ही प्रमाणपत्रे रद्द झाल्याने ‘नीलकमल’ बोटी, मालकाविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे जलवाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चपराक बसेल, असेही म्हटले जाता आहे.
आणखी वाचा-धोक्याची किनार! दादर, माहीम, आक्सा, मनोरी, गोराई, मार्वेचा समुद्रकिनारा असुरक्षित
प्रवासी क्षमतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालकाविरोधात ही कारवाई करताच दुसरीकडे सागरी मंडळाने बोट मास्टर आणि इंजिन ड्रायव्हरविरोधातही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या या दोघांची चौकशी सुरू आहे. बोटीचा सर्वेसर्वा म्हणजे बोट मास्टर. संपूर्ण बोटीची, डेकची जबाबदारी बोट मास्टरवर असते. इंजिनची जबाबदारी इंजिन ड्रायव्हरवर असते. बोटीत क्षमतेनुसारच प्रवासी घेण्याची संपूर्ण जबाबदारी या दोघांची असते. पण ‘नीलकमल’ बोटीत अधिक प्रवासी घेण्यात आल्याने या दोघांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती या दोघांचेही परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बोट मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी मुंबई सागरी मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन परवाना प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय बोट मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करता येत नाही.