मुंबई : नीट परीक्षेत गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा तातडीने रद्द करावी, असे आम्ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला कळवणार आहोत. नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दोन – तीन वर्ष मेहनत करीत असतात, पालकही त्यांच्या पाठीशी असतात. परंतु, जर अशा पद्धतीने निकाल लागून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. यासाठी वेळप्रसंगी आम्ही न्यायालयात जाण्याचा प्रयत्नही करीत आहोत. ही परीक्षा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा पैसे खाऊनच झाली आहे. मागील वर्षी दोनच विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले होते. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. इतकी संख्या कशी वाढली आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याला राज्यातील सरकारी किंवा खासगी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे. ही परीक्षा तात्काळ रद्द झाली पाहिजे, अशा सूचना महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालक भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

हेही वाचा – मुंबईत असह्य उकाडा, पुढील दोन – तीन दिवस वळीवाच्या पावसाचा अंदाज

हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांची धरपकडच दंडापोटी ३८ कोटी रुपये वसूल

‘नीट’च्या ६० हून अधिक विद्यार्थी-पालकांनी शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी विविध प्रश्न मुश्रीफ यांच्यापुढे मांडले. त्यानंतर, नीट परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे न्यायवैदक परीक्षण करण्यासाठी आणि त्याची सीबीआयकडून चौकशी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी पालकांना दिले. तसेच, ‘नीट’च्या परीक्षेची सीबीआय चौकशी व न्यायवैदक परीक्षण व्हावे. समुपदेशन व प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात यावी. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली असल्यामुळे परीक्षा रद्द करू नये, मात्र ज्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले आहेत, ते नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे रद्द करावे आणि महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असे पालकांचे म्हणणे आहे.