माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ-माथेरान छोटी गाडी पावसाळी सुटी संपवून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी ही छोटी गाडी १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळात पावसाळ्यामुळे बंद ठेवण्यात येते.
 यंदा अमन लॉज ते माथेरान दरम्यान मध्य रेल्वेने शटल सेवा सुरू केल्यामुळे नेरळ-माथेरान गाडी सुरू होण्यास विलंब लागला. आता दिवाळीच्या मुहूर्तावर ही गाडी सुरू झाली आहे. १९.९७ किमीच्या नेरळ ते माथेरान या प्रवासाला दोन तास लागत असून परतीच्या प्रवासाला एक तास ४० मिनिटे लागतात.           

Story img Loader