रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी उद्घाटन करण्यात आलेली नेरुळ-खारकोपर लोकलसेवा सोमवारपासून नियमितपणे सुरू झाली. मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या नेरूळ-खारकोपर लोकलसेवेला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नेरुळ-खारकोपर व खारकोपर-बेलापूर या मार्गावरुन ही लोकल प्रत्येकी १० अप आणि १० डाऊन फेऱ्या करेन. जाणून घ्या या रेल्वे मार्गाचे वेळापत्रक काय असेल ?
मार्ग आणि वेळापत्रक
आणखी वाचा
- नेरुळहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी – ७.४५, ८.४५, १०.१५, ११.४५,
दुपारी – १.१५, २.४५
सायं. – ४.१५, ५,४५, रात्री ७.१५, ८.४५ - बेलापूरहून खारकोपरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी- ६.२२, ९.३२, ११.०२
दुपारी- १२.३२, २.०२, ३.३२
सायं.- ५,०२, ६.३२, रात्री ८.०२, ९.३२ - खारकोपरहून नेरुळकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी – ६.५०, ९.१५, १०.४५
दुपारी -१२.१५, १.४५, ३.१५
सायं -४.४५, ६.१५, ७.४५, ९.१५ - खारकोपरहून बेलापूरकडे सुटणाऱ्या गाडय़ा
सकाळी- ८.१५, १०.००, ११.३०
दुपारी- १.००, २.३०, ४.००
सायं. – ५.३०, ७.००, ८.३०, १०.००