सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले असले तरी राष्ट्रवादी तीन ते चार मंत्र्यांना घरी पाठवून नव्या चेहऱ्यांना संधी देईल, अशी अटकळ बांधली जात आह़े तरी कोणाची विकेट जाणार यावरून राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने सारेच गोंधळलेले होते. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मंगळवारी विस्तार करण्यात येणार असला तरी काँग्रेस या दिवशी मंत्र्यांमध्ये फेरबदल करणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जातो. राष्ट्रवादीची प्रतिमा सुधारण्यावर पवार यांनी भर दिल्यास विविध आरोप झालेले छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव देवकर यांच्यावर गंडांतर येऊ शकते. तरुण वर्गाकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले. आर. आर. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे गेली दोन वर्षे मंत्रिपदासाठी प्रतिक्षेत असलेल्यांचा या वेळी समावेश होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा