अभिनेत्री व किंग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल संघ मालकीतील भागीदार प्रिती झिंटा हीच्या विनयभंग प्रकरणी उद्योगपती नेस वाडिया याचा जबाब अखेर परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांच्याकडे गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नोंदवण्यात आला.
किंग्स इलेव्हन या आयपील संघात भागीदार असलेले उद्योगपती नेस वाडिया व अभिनेत्री प्रिती झिंटा यांच्यातील प्रेम संबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. ३० मे २०१४ रोजी वानखेडे स्टेडीयमवर चालू असलेल्या एका सामन्यादरम्यान नेस वाडिया यांनी आपला विनयभंग करत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप प्रिती यांनी केला होता. याबाबतची तक्रार प्रिती झिंटा हीने मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात १३ जून २०१४ रोजी दाखल केली होती.
झिंटा विनयभंगप्रकरणी वाडियाचा जबाब नोंदवला
डॉ. मनोज शर्मा यांच्याकडे गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नोंदवण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-05-2016 at 02:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ness wadia records statement in preity zinta case after two years