अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. नेस खोलीत बंद करून सिगारेटचे चटके द्यायाचा, अशी माहिती प्रीतीनेच पोलिसांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. नेसपासून जिवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे.
प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडिया विरोधात मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रीतीने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन चार पानी पत्र दिले होते. त्या पत्रात अशा अनेक धक्कादायक बाबी प्रीतीने लिहिल्या आहेत.
नेसने एकदा दमदाटी आणि शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्याचे वळ प्रीतीने आईला दाखवले होते. आईने तेव्हाच तिला पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. पण वाडियाशी संबंध तोडल्याने तिने त्यावेळी पोलिसात जाण्याचे टाळले होते. दरम्यान, नेस वाडियाने यापूर्वीच हे आरोप फेटाळले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा