मॅगी नुडल्समध्ये अपायकारक घटक आढळल्यानंतर नेस्ले इंडियाने भारतीय बाजारपेठेतून मॅगीची पाकिटे परत मागविली होती. आता हा साठा नष्ट करण्यासाठी नेस्लेकडून आता अंबुजा सिमेंट या कंपनीला तब्बल २० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. अंबुजा सिमेंटच्या चंद्रपूर येथील प्रकल्पाच्या जागेत ही पाकिटे जाळून टाकण्यात येणार आहेत.
मॅगीमध्ये चवीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोनोसोडियम ग्लुटामेटच्या मर्यादबाहेर समावेश असल्याचे आढळले होते. त्यामुळे केंद्रीय अन्न आणि सुरक्षा नियामक मंडळाकडून (एफएसएसआय) “नेस्ले इंडिया‘च्या नऊ प्रकारच्या नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे कंपनीची बाजारातील तब्बल ३२० कोटी रुपयांची उत्पादने परत मागविण्यात आली होती. सध्या बाजार, वितरण केंद्र यांच्याकडून मॅगीचे पॅकेट्स परत मागवण्यासाठीही नेस्ले इंडियाला मोठा खर्च करावा लागत आहे. एफएसएसआयने ५ जून रोजी मॅगी न्युडल्सवर बंदी आणली होती. या निर्णयाविरोधात नेस्लेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Story img Loader