मुंबई : मध्य रेल्वेवरील दिवा येथील पाॅइंटच्या तांत्रिक कामानिमित्त ठाणे – दिवा स्थानकादरम्यान रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस पनवेलपर्यंत धावणार असून, पनवेलवरूनच तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे रवाना होणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना ही एक्स्प्रेस पकडण्यासाठी पनवेल गाठावे लागणार आहे. त्यासाठी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

हेही वाचा…मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांनामालमत्ता जप्तीची नोटीस, १० मोठ्या मालमत्ताधारकांकडे सुमारे २२२ कोटी रुपयांची थकबाकी

मध्य रेल्वेने दिवा येथील पाॅइंट क्रमांक १०७ बी आणि पाॅइंट क्रमांक १११ बीवरील स्विच बदलण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मेगाब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ नोव्हेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर, २४ नोव्हेंबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पनवेल स्थानकावरून चालवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Story img Loader