मुंबई : आपण मरेपर्यंत जिवंत असतो. त्यामुळे कधी तरी मरू या भीतीमुळे आजचे जगणं कधीच थांबवू नये. आजचा क्षण जगून घ्यायला हवा. हा क्षण परत आपल्या आयुष्यात येणार नाही. शरद पोंक्षे आजारी असतानाही ‘हिमालयाची सावली’ करीत होता, तेव्हा तो हे नाटक का करतो असा प्रश्न मला पडला होता. पण जेव्हा मी कर्करोगावर उपचार सुरू असतानाही ‘बिग बॉस’चा प्रोमो शूट केला तेव्हा समजले काम सुरू राहिलेच पाहिजे. मी श्रेयस तळपदेलाही सांगितले, प्रत्येक दिवस हा नवीन असतो. माझ्या हृदयात तीन स्टेन आहेत. मी स्वतःला स्टेनमॅन म्हणतो. आपल्या आजाराने कधी खचून न जाता सतत स्वतःचे मनोबल वाढवायला हवे, असा सल्ला दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात दिला.

महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट १ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी सक्सेना, शरद पोंक्षे, दीप्ती लेले मुख्य भूमिका साकारत आहेत. सोमवार १२ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर सिनेपोलिस फन रिपब्लिक अंधेरी येथे प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, दीप्ती लेले आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”

हेही वाचा – मुंबई : कुटुंबातील चौघांना अन्नातून गुंगीचे औषध देऊन ५० लाखांची लूट, दोन नोकरांविरोधात गुन्हा दाखल

या सोहळ्याच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि शरद पोंक्षे हे कलाकार आजारपणानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. हा चित्रपट परिवारावर आधारित असून पालक आपल्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घेत असतात हे प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहतूक ब्लॉक

यावेळी आपल्या आजारपणाच्या आठवणींबद्दल सांगताना महेश मांजरेकर म्हणाले की, मला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर मी हिंदुजा रुग्णालयात होतो. त्यावेळी माझ्या रूममध्ये धमाल करत होतो. मानसिकतेने तुम्ही कणखर असाल तर कोणत्याही आजाराला सामोरे जाऊ शकता. मी या आजारातून बाहेर पडू शकतो ही मानसिकता असेल तर कोणत्याही आजारातून बाहेर पडता येते.