मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून आठ नव्या न्यायमूर्तीनी शुक्रवारी शपथ घेतली. या नव्या नियुक्त्यांमुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या ६० झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या ‘सेंट्रल हॉल’मध्ये नव्या न्यायमूर्तीना मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी शपथ दिली. न्यायमूर्ती सर्वश्री सुरेश गुप्ते, झेड्. ए. हक, के. आर. श्रीराम, गौतम पटेल, अतुल चांदुरकर, रेवती ढेरे, महेश सोनाक आणि रवींद्र घुगे यांचा नव्या अतिरिक्त न्यायमूर्तीमध्ये समावेश आहे.  हे विविध बार असोसिएशनचे वकील आहेत.

Story img Loader