सर्कस, आनंद मेळावा, चित्रपट, नाटकांवर नवा करमणूक कर आकारण्याचा प्रस्ताव विधी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने दफ्तरी दाखल केला. तत्पूर्वी शिवसेना नगरसेवकांनी हिंदी चित्रपटांना करमणूक करात सवलत देण्याची मागणी करीत प्रशासनावर ताशेरे ओढले. मात्र प्रस्ताव दफ्तरी दाखल झाल्याने तूर्तास नवा करमणूक कर टळला. नव्या करमणूक कराची आकारणी करणारा प्रस्ताव प्रशासनाने विधी समितीच्या बैठकीत सादर केला होता. वातानुकूलीत चित्रपटगृहातील प्रत्येक खेळासाठी ६० रुपये, तर बिगरवातानुकूलीत चित्रपटगृहात ४५ रुपये करमणूक कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. एकत्रित पैसे भरल्यास त्यात तीन ते चार रुपयांनी सूट देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली होती. मात्र सरसकट १५ टक्के सवलत देण्याची, व हिंदी चित्रपटांना यातून वगळण्याची मागणी सेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी केली. त्यास मनसे नगरसेवकांनी विरोध केला. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विधी समिती अध्यक्ष मकरंद नार्वेकरांनी प्रस्ताव दफ्तरी दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा