मुंबई : ‘एआय’, ‘चॅट-जीपीटी’-‘डीपसिक’च्या कोलाहलातही अचूक माहितीचे मूल्य पुढील काळात राहणार. सगळीच माहिती योग्यरीत्या पुरवणारे आणि वर्षभरातील राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृती आदी वैश्विक घटनानोंदींचा ऐवज देणारे ‘लोकसत्ता’चे लोकप्रिय पुस्तक ‘वर्षवेध’ यंदा नव्या स्वरूपात लवकरच भेटीला येईल. २०२४ सालात घडलेल्या घटना, या वर्षाचे खास मानकरी असा भरगच्च वाचनानंद देणारा मजकूर या अंकात वाचायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो. पहिल्या वर्षापासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे अनेक वेळा पुनर्मुद्रण केले जाते. २०२४मध्ये घडलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टीची इत्थंभूत खबरबात या अंकामध्ये सापडेल. अमेरिकी आणि भारतीय निवडणूक, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण ठरलेले वर्ष, वाळवंटात पडलेला मुसळधार पाऊस, आखाती देशातील पूर आदी सर्व घटनांचे सचित्र तपशील अंकात आहेत. मराठी आणि हिंदी मनोरंजन उद्याोगाची वाटचाल, अर्थविषयक घडामोडी आणि लक्षवेधी ठरलेल्या बातम्यांचे विषय यांवर विस्ताराने माहिती मिळेल. आंतरराष्ट्रीय घडामोडींइतक्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील महत्त्वपूर्ण घटना यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

नवे काय

अशक्य स्थितीतून अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आलेले देवेन्द्र फडणवीस, पर्यावरणाच्या कामासाठी जागतिक सन्मान मिळविणारे माधव गाडगीळ, बुद्धिबळात लहान वयात जगज्जेता बनलेला गुकेश, जागतिक चित्रपट विश्व गाजवणारी भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडिया आदींची दखल घेणारे मान्यवरांचे लेख हे यंदाचे ‘वर्षवेध’चे खास आकर्षण असेल.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

● सहप्रस्तुती : लक्ष्मी फॉरेक्स लिमिटेड आणि सिडको

● सहप्रायोजक : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई , महानिर्मिती, रुणवाल रियल्टी, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि., तन्वी हर्बल, रावेतकर बिल्डर्स, टी जे एस बी सहकारी बँक लि. , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,

● सहकार्य : केसरी टूर्स आणि जे प्राईम बिल्डकॉन

● पॉवर्ड बाय : दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., दोस्ती रियाल्टी, न्यू इंडिया एश्योरन्स, आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड, वी. पी. बेडेकर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, जानकी ज्वेलर्स आणि ब्रह्मविद्या साधक संघ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New format of varshavedha coming soon complete encyclopedia for students collectors amy