मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता याला अटक करण्यात आली. बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील कार्यालयातील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हितेश मेहताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. हा गैरप्रकार २०२० पासून १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये पुढील सहा महिन्यांसाठी नवीन कर्ज देण्यावर, नवीन ठेवी स्वीकारण्यावर किंवा पैसे काढण्याची परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेच्या मुंबई, ठाणे, सुरत आणि पुणे येथे बँकेच्या ३० शाखा आहेत. बँकेला १ नोव्हेंबर १९९० रोजी ‘शेड्युल्ड बँके’चा दर्जा मिळाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New india co operative bank general manager hitesh mehta arrested mumbai print news ssb