मुंबई : सलग पाच वर्षे मंडप परवाना मिळविण्यासाठी गेल्या दहा वर्षांत मंडळावर एकदाही कारवाई न होण्याची अट यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळांना जाचक ठरण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणांकडून एकदाही कारवाई न झालेली मंडळेच कमी आहेत. त्यामुळे बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षे मंडप परवाना मिळणे दुरापास्त ठरणार आहे.

या संदर्भातील शासन निर्णयात बदल करण्याची मागणी होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या शिफारसीप्रमाणे शासन निर्णयात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला पाठविण्यात येईल. मात्र, या प्रक्रियेस होणाऱ्या विलंबामुळे यंदा तरी मंडळांना सलग पाच वर्षांच्या मंडप परवान्यास मुकावे लागणार आहे.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

हेही वाचा…Dadar Suitcase Murder : दादर सूटकेस हत्या प्रकरणाला नवं वळण, अर्शदच्या पत्नीचे मारेकऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप

दरवर्षी मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मोकळी मैदाने, रस्ते, पदपथ, चाळी, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. मुंबईमध्ये १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी बहुसंख्य मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मंडपाचे आकारमान, त्याची रचना, तेथे करण्यात येणाऱ्या अग्निप्रतिबंधक उपाययोजना आदी विविध माहिती मंडळांना सादर करावी लागते. त्याचबरोबर अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाण्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर केल्यानंतर महापालिकेकडून मंडपासाठी परवाना देण्यात येतो.

रस्ता वा पदपथावर मंडप उभारून साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने २०१५ मध्ये दिले आहेत. गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे पादचारी वा वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा…म्हाडाच्या २०३० घरांसाठी १३ सप्टेंबरला सोडत, शुक्रवारपासून अर्ज विक्री-स्वीकृती; आज जाहिरात

काही मंडळांकडून महापालिका, पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नियमभंग केलेल्या अथवा कारवाई झालेल्या मंडळांची संख्या तुलनेने अधिक आहे. तसेच करोनाकाळात अनेक मंडळांनी गणेत्सव साजरा केला नाही. त्यामुळे सलग १० वर्षे उत्सव साजरा करण्याच्या अटीतून ही मंडळे बाद होण्याचीच शक्यता आहे.

रस्ते, पदपथ अथवा सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांना मंडप परवान्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेकडून मंडप परवाना देण्यात येतो. परंतु पुढील पाच वर्षांसाठी स्थानिक पोलीस ठाणे अथवा वाहतूक पोलिसांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र कशाच्या आधारे मिळणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हेही वाचा…जनहित याचिकेच्या माध्यमातून राजकारण करू नका; चित्रा वाघ यांना न्यायालयाचे खडे बोल

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांसाठी मंडप परवाना द्यायचा झाल्यास अटी व शर्ती घालू नये. कोणत्याही अटी व शर्तीशिवाय मंडप परवाना द्यावा. अन्यथा मुंबईतील बहुसंख्य मंडळांना सलग पाच वर्षांच्या मंडप परवान्यापासून मुकावे लागेल. – ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

हेही वाचा…‘लॉजिस्टिक धोरणा’द्वारे पाच लाख नोकऱ्या; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

नियमांचे उल्लंघन

मंडपासाठी खोदलेले खड्डे, कर्णकर्कशआवाजात सुरू असलेले ध्वनिक्षेपक, रात्री उशीरा ढोल-ताशाच्या गजरात वाजतगाजत काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुका, पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन, सजावटीसाठी वापरण्यात येणारे बंदीयोग्य साहित्य, गणेश आगमन-विसर्जन मिरवणुकीतील वाद, परवानगीशिवाय झळकवलेल्या जाहिराती आदी विविध कारणांमुळे बहुसंख्य मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे.