लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : हवा खेळती राहावी, तापमान थंड राहावे यादृष्टीने घराचे बांधकाम करण्याचा प्रयत्न असतो. मात्र घर किंवा इमारतीच्या बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे घरातील तापमान अधिक राहते. याचा परिणाम आरोग्यावर होतो. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबई आणि कम्युनिटी डिझाईन एजन्सी यांनी संयुक्तरित्या संशोधन केले. त्यामध्ये भाजलेल्या चिकणमातीच्या विटा (बर्ट क्ले ब्रिक्स) आणि वाफेवर तापवून तयार केलेले वायुमिश्रित काँक्रीटचे ठोकळे (एएसी ब्लॉक्स) या पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर केल्यास घरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

home decoration on diwali diwali decoration ideas diwali decoration ideas for home
घर सजवण्याची वेळ झाली…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
easy kandil making at home for diwali how to make akashkandil at home easy steps video diwali lantern
Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
pune citizens are in trouble due to bad weather Care advice from healthcare professionals
खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला
imd predicted temperature will remain high in mumbai for the next two days
उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ

तापमानाचा मनुष्याची प्रकृती व कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो. व्यवस्थित खेळती हवा नसेल तर अति-उष्णता व आर्द्रता असलेल्या भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात जगणे कठीण होऊन बसते. तीव्र उष्णतेच्या लाटा व अवतीभवतीच्या परिसरापेक्षा जास्त उष्ण शहरी भाग सारख्या जागतिक हवामान बदलांमुळे या अडचणींत आणखी भर पडते. एखादी इमारत वास्तव्य करण्यास किती अनुकूल आहे हे मुख्यत: बांधकाम साहित्यावर अवलंबून असते. इमारतीच्या आवरणाचा ४० टक्क्यांपेक्षा जास्त भाग बांधकाम साहित्याने व्यापलेला असतो. त्याचा उष्णता शोषून, साठवून आणि उत्सर्जित करून घरातील तापमान ठरवण्यात योगदान असते.

आणखी वाचा-नोकरदार महिलांसाठी २२ मजली वसतीगृह, आचारसंहितेनंतर म्हाडाचा प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव

तपास पद्धती

  • कॉम्प्रेस्ड स्टेबिलाइझ्ड मातीचे ठोकळे आणि कॉम्प्रेस्ड फ्लाय अॅशच्या ठोकळ्यांपेक्षा एएसी ब्लॉक्स हे बाहेरील उष्णतेपासून घरातील तापमान कमी ठेवण्यामध्ये प्रभावशाली ठरले.
  • इमारतींची छते, भिंती, फरशी, खिडक्या, दरवाजे आणि पाया यांचा आवरणात समावेश असून, ते घराच्या आत व बाहेरील तापमानाला प्रतिबंध म्हणून काम करतात व उष्णता हस्तांतरणावर लक्षणीय परिणाम करतात. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञान संस्था, (आयआयटी) मुंबई व कम्युनिटी डिझाइन एजन्सीच्या संशोधकांनी या अभ्यासात भितींसाठी वापरण्यात येणारे साहित्य व त्यांची तापमान टिकविण्याची क्षमता यांचा परस्पर संबंध शोधणारी नवीन पद्धत विकसित केली आहे.
  • ही पद्धत विकसित करताना त्यांनी कोणतेही कृत्रिम वातानुकूलन नसलेल्या घरांच्या आतील तापमान तपासले. तसेच कॉम्पुटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स नावाचे एक अनुरूपणावर आधारित संख्यात्मक तंत्र वापरून भिंतीच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य, हवेचा बदलणारा प्रवाह व आरामदायी तापमान यांच्यातील परस्पर संबंध तपासला. सीएफडी तंत्रज्ञान वापरून हवेच्या प्रवाहाचे विश्लेषण केले. यात ‘सर्व खिडक्या उघड्या आणि दारे बंद’ आणि ‘सर्व खिडक्या, दारे बंद’ या विविध स्थितींमध्ये हवेचा प्रवाह आणि तापमान तपासण्यात आले.