नवी मुंबई विमानतळासाठी आवश्यक असणारी २५० हेक्टर वन जमीन हस्तांतरित करण्यास वन खात्याने मान्यता दिली आहे. तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरसाठीही जमीन उपलब्ध होणार आहे.  नवी मुंबई नियोजित विमानतळासाठी २५० हेक्टर वन खात्याची जमीन वापरण्यास राज्य सरकारने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. प्रस्तावित मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉकरिता ठाणे  व रायगड जिल्ह्य़ांमधील ५८ हेक्टर वन जमीन वापरण्यास मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात सात पोलीस ठाणी उभारण्याकरिता वन खात्याच्या जागेचा वापर करण्यास मान्यता दिल्याचे कदम यांनी सांगितले.

Story img Loader