नवी मुंबई विमानतळासाठी आवश्यक असणारी २५० हेक्टर वन जमीन हस्तांतरित करण्यास वन खात्याने मान्यता दिली आहे. तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरसाठीही जमीन उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई नियोजित विमानतळासाठी २५० हेक्टर वन खात्याची जमीन वापरण्यास राज्य सरकारने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. प्रस्तावित मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉकरिता ठाणे व रायगड जिल्ह्य़ांमधील ५८ हेक्टर वन जमीन वापरण्यास मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात सात पोलीस ठाणी उभारण्याकरिता वन खात्याच्या जागेचा वापर करण्यास मान्यता दिल्याचे कदम यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा