कुख्यात गुंड छोटा शकीलने आपल्या टोळीत गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेले ‘क्लीन’ सदस्य घेण्यास सुरुवात केली आहे. अबू सालेमवर गोळीबार करण्यासाठी देवेंद्र जगतापला गावठी पिस्तूल पोहोचविणाऱ्या मनोज लामणेला (३०) दरोडाविरोधी पथकाने अटक केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. हा मनोज लामणे छोटा शकील टोळीतील सदस्य असून त्याच्या नावावर एकही गुन्हा नाही.  ३० जून रोजी तळोजा कारागृहात अबू सालेमवर त्याच कारागृहातील देवेंद्र जगताप ऊर्फ जेडीने हल्ला केला होता. मनोज लामणे या छोटा शकीलच्या सदस्याने जेडीला तुरुंगात पिस्तूल पोहोचवले होते. मनोजला अटक केल्यानंतर छोटा शकीलच्या या नव्या कार्यपद्धतीची माहिती उघड झाली आहे.
शकीलची कार्यपद्धती
कारागृहातील आपल्या माणसांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी  शकीलला ‘मेसेंजर’ हवा होता. शकीलने गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेले तरुण चेहरे शोधले. मनोज लामणे गेल्या सहा महिन्यांपासून तो कारागृहात जाऊन जेडीला भेटत होता. छोटा शकील आणि जेडीमधील तो महत्त्वाचा दुवा होता.

Story img Loader