महाराष्ट्रातील नाट्यवर्तुळात अभिमानाचा विषय असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नव्या पर्वास प्रारंभ होत असून या वर्षी या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेस ‘जवाहरलाल नेहरू प्राधिकरण’ (जेएनपीए)चे प्रायोजकत्व लाभले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे राज्यभरातील आठ केंद्रात या स्पर्धेची प्राथमिक फेरी सादर होईल आणि २१ डिसेंबरला मुंबईत महाअंतिम सोहोळ्यात, अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत यंदाची ‘लोकांकिका’ निवडली जाईल.

या स्पर्धेचा सविस्तर तपशील लवकरच ‘दै लोकसत्ता’त प्रस्तृत केला जाईल.

Donald trump Vladimir putin
विश्लेषण: ‘मित्र’ पुतिन यांच्या सतत संपर्कात असतात ट्रम्प? नव्या पुस्तकातील दाव्याने युक्रेनच्या चिंतेत भर?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing
Israeli PM Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी UN मध्ये भारताचा नकाशा दाखवला; मध्य-पूर्वेतील संघर्षावर मोठं वक्तव्य
Loksatta editorial India dominates Chess Olympiad Tournament
अग्रलेख: सुखद स्वयंप्रज्ञेचे सुचिन्ह!
Russia interpreted the change as a warning to the West
बदलातून पाश्चिमात्य देशांना इशारा; रशियाचे स्पष्टीकरण
Stock market indices Sensex and Nifty hit 85000 high
सेन्सेक्स ८५ हजारांच्या शिखरावरून माघारी
lokmanas
लोकमानस: प्रामाणिक प्रतिमाच वाचवू शकेल
loksatta kutuhal What are the major language formats
कुतूहल: विशाल भाषा प्रारूपे काय आहेत?

लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील , ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले कलागुण सादर करीत असतात . नाट्यसंस्कृतीच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने लोकसत्ता राबवित असलेल्या या उपक्रमाला जे.एन.पी.ए. चे कायमस्वरूपी संपूर्ण सहकार्य असेल. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारतासाठी जाहीर केलेल्या “ पंच प्राण” संकल्पांमध्ये आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन यांचा समावेश आहे. नुकताच अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी जे.एन.पी.ए. चे हे पहिले पाऊल ! – उन्मेष वाघ, अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू प्राधिकरण

लोकसत्ता लोकांकिका ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील शहरे आणि ग्रामीण भागातील नाट्यवेडया तरुणांसाठी महत्वाची ठरत आहे. या स्पर्धेने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. सॉफ्ट कॉर्नर हे या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून लोकसत्ताशी जोडलेले आहे आणि यावर्षीही आमचे सहकार्य या स्पर्धेला असेल. – दिलीप कुलकर्णी, अध्यक्ष, सॉफ्ट कॉर्नर