मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेमध्ये ५० अत्याधुनिक, विनावातानुकूलित शयनयान बसची बांधणी सुरू आहे. यापैकी दोन बस गुरुवारपासून मुंबई-बांदा मार्गावर धावणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी असलेल्या सवलती लागू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या टप्प्यात मुंबई सेंट्रल-बांदा आणि बोरिवली-बांदा या मार्गावर शयनयान बस सुरू केली आहे. या बसमध्ये ३० शयनकक्ष असून मोबाइल चार्जिग, स्वतंत्र खिडकी, झोपण्यासाठी गादी, उशी आदी सुविधा असतील. सुरक्षिततेसाठी आपत्कालीन दरवाजा, आग प्रतिबंधक उपकरणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये काचा फोडण्यासाठी हातोडा आदी उपाययोजनाही बसमध्ये करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>पालकमंत्री दीपक केसरकर यांना अद्याप दालनाची प्रतीक्षाच; कामकाज मात्र सुरू

मुंबई सेंट्रल-बांदा बस पुणे-कोल्हापूरमार्गे धावणार आहे. या बसचे भाडे १,२४६ रुपये आहे. बोरिवली-बांदा बस महाड, चिपळूणमार्गे धावणार असून या बसचे भाडे ५८४ रुपये असेल, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.