पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला जोडण्यात आलेल्या खास डब्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेने या गाडीला आणखी दोन विशेष डबे जोडले आहेत.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून दररोज दोन हजारहून अधिक पर्यटक या मिनी ट्रेनमधून प्रवास करीत आहेत. २३ डिसेंबर रोजी केवळ एकाच दिवशी या मिनी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या विक्रमी झाल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. त्या दिवशी ३०९९ तिकीटे विकण्यात आली. यामध्ये दुसऱ्या आणि प्रथम वर्गाबरोबरच विशेष डब्यातून प्रवास करण्याचा आनंद अनेक कुटुंबांनी लुटला. अवघ्या ११७५ रुपयांमध्ये केवळ आपल्या कुटुंबासमवेत स्वतंत्रपणे प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो. आलिशान आसन व्यवस्था, बाहेरील दृश्ये गाडीतील पडद्यावर दाखविणारा टीव्ही आणि खानपान व्यवस्था असलेला हा डबा सध्या एकाच गाडीला जोडण्यात येत होता.
पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अमन लॉज ते माथेरान दरम्यान सुरू केलेल्या शटल सेवेलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पर्यटकांची वाढती मागणी पाहून नेरळ-माथेरानच्या सर्व गाडय़ांना आता प्रत्येकी एक आलिशान डबा जोडण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा