नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ‘महिला विशेष’ बसगाडी सुरू करून बेस्टने महिलांना आगळीवेगळी भेट दिली आहे.
गोरेगाव (प.) रेल्वे स्थानक ते चिंचोली दरम्यान महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेस्टने या मार्गावर बस क्रमांक २६२ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १ जानेवारी रोजी भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बसचे उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत बेस्टने ५३ महिला विशेष बसगाडय़ा सुरू केल्या आहेत. तसेच पहिल्या स्थानकावरून सुटणाऱ्या ३४ बसगाडय़ांमध्ये महिलांना प्रथम प्रवेश देण्याची योजनाही बेस्टतर्फे राबविण्यात येत आहे. तसेच पहिल्या स्थानकावरून सुटणाऱ्या ३४ बसगाडय़ांमध्ये महिलांना प्रथम प्रवेश देण्याची योजनाही बेस्टतर्फे राबविण्यात येत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-01-2013 at 04:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year gift by best to ladies