दिशा खातू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पब, रेस्टॉरन्ट्स, पर्यटन कंपन्या सज्ज

नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नवनवीन पर्यायांच्या शोधात असलेल्यांना आकर्षित करून घेण्यासाठी रेस्टॉरन्ट्स, बार, पब सज्ज झाले आहेत. ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव करण्यात आला आहे. अनेक पर्यटन कंपन्यांनी शहराबाहेर कर्जत, पालघर, पुणे अशा ठिकाणी पाटर्य़ा आयोजित केल्या आहेत. त्यासाठीदेखील खास सवलती देण्यात येत आहेत.

नववर्षांच्या स्वागताकरिता यंदाही मुंबईतील विविध हॉटेल्स, पब आणि क्लबमध्ये पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक कार्यालयांना १ जानेवारीला सुट्टी असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरापासून लांब जाऊ न पार्टी करण्याकडे कल वाढला आहे. अनेक पर्यटक कंपन्या अशा पाटर्य़ा आयोजित करीत आहेत. पुण्याचे पवना लेक, खारघर, पालघरमधील नंदगाव, डहाणू, अलिबाग, बेलापूर अशा ठिकाणी निरनिराळ्या थीमवर आधारित पाटर्य़ा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इलेक्ट्रॉनिक संगीत

शहरात अंधेरी, वांद्रे, लोअर परळ अशा ‘पार्टी कल्चर’साठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात पब, बार, रेस्टॉरंटमध्ये विविध थीमवर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक संगीताची आवड असलेल्यांना गोरेगावच्या नेस्कोमध्ये ‘न्युक्लिया’ पार्टीत याचा आनंद घेता येईल. याचे शुल्क मात्र २ हजार ५०० ते ७ हजार इतके आहे. अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील ‘बॉम्बे कॉकटेल’ पबमध्ये ‘मिडनाइट मॅडनेस’ पार्टी होईल. कोल्ड पायरो फटाके, स्मोक गन, कार्निव्हल पद्धतीचे नृत्य, नाटुकले अशी गंमतजंमत इथे असेल. अंधेरी एमआयडीसीच्या रॅडीसन, जुहूच्या नॅव्हटेल, जेएलडब्ल्यूए आदी पंचतारांकित हॉटेलांमध्ये वेगवेगळी पार्टी पॅकेजेस दिली जातात. त्यात नृत्य, पूल साइड पार्टी, वैविध्यपूर्ण पदार्थ, उंची मद्य याकरिता ५ ते ११ हजार रुपयांपर्यंतची पॅकेजेस घेता येतील. अनेक ठिकाणी बॉलीवूड थीमवर एलेगांझा या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. याचे शुल्क ५ हजार ते १० हजार रुपये असेल. यंदा पब, हॉटेलांमधील पाटर्य़ाकरिता ‘बॉलीवूड’ ही थीम अनेक ठिकाणी आहे. लोकांची सिनेमाची आवड पाहता या थीमला प्रतिसादही चांगला लाभतो. आमच्याकडे आतापर्यंत १०० जणांनी पूर्वनोंदणी केल्याचे मरोळच्या ‘फ्रिंजो पब’चे एन. रिबेरो यांनी सांगितले. खोपोली मार्गावरील ‘इमॅजिका’सारखी थीम पार्कही नवीन वर्षांच्या स्वागताकरिता सज्ज झाली आहेत. पोटात गोळा आणणाऱ्या राइड्सबरोबरच मद्य, जेवण, संगीत कार्यक्रम अशी मेजवानी येथे असेल. फक्त यासाठी दीड हजार ते आठ हजार रुपये मोजण्याची तयारी हवी.

सवलतींचे गाजर

शहराबाहेरील पाटर्य़ाकरिता ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. २५ डिसेंबरला दुपारी १२ पर्यंत ६० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याचे ‘३६५ हॉप्स’ या ऑनलाइन पर्यटन कंपनीचे विपणन व्यवस्थापक कमला बोरा यांनी सांगितले. संकेतस्थळांवर १० ते ३० टक्के एवढी सवलत दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यातील अनेक कॅफे, हॉटेले सवलती देत आहेत. ५०० रुपये देयक झाल्यास २० टक्के सवलत, मध्यम आकाराच्या पिझ्झावर आइस्क्रीम मोफत, पूर्वनोंदणी केली तर मॉकटेल मोफत, पेयांवर १० टक्के सवलती आहेत.

बाग, जंगल सफर, बॉलीवूड थीम

पुण्याच्या पवना लेकजवळ तंबू निवास (‘टेंट कॅम्पिंग’), शेकोटी, बार्बेक्यू, डीजे अशी धम्माल रात्रभर असेल. मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या खारघर येथे मोकळ्या हवेत पार्टीचा आनंद घेता येईल. पालघर जिल्ह्य़ातील तारापूरच्या नंदगावाजवळ गावरान पार्टीचा ठसका अनुभवता येणार आहे. यात चुलीवरचे जेवण, बार्बेक्यू, तरणतलाव, शेकोटी, खेळ इत्यादींचा आनंद घेता येईल. बेलापूरच्या ‘द पार्क’ या चार तारांकित हॉटेलमध्ये बॉलीवूड थीम पार्टी होणार आहे. दीड ते साडेसहा हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात आले आहे. डीजे, पंजाबी ढोल, टॅटू, बार फ्लोअर अशी धूम इथे असेल, तर डहाणूतील यमुनावन येथे चिकू बागेची सफर, जंगल सफर याबरोबरच डीजे, लेझर लाइट सेटअप, फायर बॉटल, तंबू, डीजे असा सगळा जामानिमा आहे. अलिबागला जाऊन पार्टी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तिथे प्रति व्यक्ती अडीच ते तीन हजार रुपये शुल्क आकारून पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे.