भरधाव डंपरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. शीव येथील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी हा अपघात घडला. हे जोडपे मामाच्या मुलाच्या लग्नासाठी जात होते.
शिवाजी सावंत (२९) हा पत्नी स्वप्नाली (२७) हिच्याबरोबर वडाळा शिवडी क्रॉसरोड येथील सुभाष विकास मंडळ चाळीत राहत होते. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. शिवाजीच्या मामाच्या मुलाचे रविवारी एव्हराड नगर येथे लग्न होते. त्यामुळे सकाळी तो स्वप्नालीला घेऊन मोटारसायकलवरून जात होता.
सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शीव येथील उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने (एमएच ०१ एलए ९१९०) त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यामुळे दोघे रस्त्यावर फेकले गेले आणि डंपरने त्यांना चिरडले. त्या दोघांना तातडीने शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शिवाजीने हेल्मेट घातले होते, पण डंपर अंगावरून गेल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
डंपरचालक आस मोहम्मद उमर धुलिया (२६) हा अपघातानंतर डंपर सोडून पळून गेला होता. पण दुपारी तो स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील यांनी दिली.
डंपरचालक हा कॉटन ग्रीन येथे राहणारा असून कचऱ्याचा डंपर घेऊन तो देवनार येथे जात होता.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
डंपरच्या धडकेने नवविवाहित जोडप्याचा मृत्यू
भरधाव डंपरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने दुचाकीवरील नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. शीव येथील उड्डाणपुलावर रविवारी सकाळी
First published on: 23-12-2013 at 01:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly married couple killed in road accident