एके ४७ रायफलमधून गोळी सुटल्याने शीघ्र कृती दलाचे दोन जवान जखमी झाले. बुधवारी दुपारी दहिसर येथील शीघ्र कृती दलाच्या कक्ष २ मध्ये ही दुर्घटना घडली.
कक्ष २ मध्ये बंदोबस्तावर असलेले हरेश पडय़ाळ दुपारी दोनच्या सुमारास डय़ुटी संपवून आपल्या खोलीवर आले. त्यावेळी त्यांच्या हातातील एके ४७ रायफल खाली पडली. रायफलीतून एक गोळी सुटली आणि ती राजेश कुंभार या शिपायाच्या डाव्या मांडीला लागून सचिन अवघडे या दुसऱ्या शिपायाला उजव्या मांडीला चाटून गेली. दोघांना त्वरीत उपचारासाठी दहिसरच्या सुवर्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Story img Loader