लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, ५ मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ४८ वर्षे होते. यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

प्रशांत नाडकर हे १९९८ पासून इंडियन एक्स्प्रेस समूहात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. ते २०१९ पासून दुर्धर आजाराने ग्रस्त होते. या आजारपणातच त्यांच्या दृष्टीवरही परिणाम झाला. परंतु खचून न जाता काही काळ त्यांनी आपले काम सुरू ठेवले. यानंतर २०२० साली आलेल्या करोनाकाळात नाडकर यांनी संपूर्ण मुंबई पिंजून काढली आणि करोनामुळे टाळेबंदीमधील मुंबईचे व रुग्णालयातील परिस्थितीचे चित्र कॅमेऱ्यात कैद केले. मात्र त्यानंतर दृष्टीवर खूपच परिणाम झाला आणि त्यांना काम करणे शक्य झाले नाही. गेले काही महिने ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र शुक्रवारी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा- मुंबई: मैदानातील प्रखर दिवे आणि मध्यरात्रीनंतरही चालणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यांमुळे रहिवासी बेहाल

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. त्यावेळीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत नाडकर यांनी कर्तव्य बजावत महापूराची छायाचित्रे टिपली. याचसोबत १९९१ साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मुंबईत झालेला बंद, मुंबईतील लोकल रेल्वे बॉम्बस्फोट, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, राजकीय घडामोडी आदी विविध महत्त्वपूर्ण घटनांची त्यांनी छायाचित्रे टिपली होती. नाडकर यांच्या अनेक छायाचित्रांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ते पत्रकार संघाचे माजी कार्यकारणी सदस्यही होते.

कुठेही कोणतीही घटना घडली की नाडकर छायाचित्रे टिपण्यासाठी त्वरित घटनास्थळी पोहोचायचे. तसेच सर्वांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. एक बेधडक व बिनधास्त वृत्तपत्र छायाचित्रकार आणि चांगला मित्र हरपल्याची भावना, नाडकर यांच्या वृत्तपत्र छायाचित्रकार मित्रांनी व्यक्त केली आहे.