मुंबई : Mumbai Weather Forecast मुंबईमध्ये पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना आपापल्या विभागातील सखलभागांची पाहणी करण्याचे, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्याच पावसात मुंबईत सर्वत्र पाणी साचल्यामुळे महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यातच आता मुंबईत बुधवारपासून पुढील चार – पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चहल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्यातील अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> Weather Update: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा मंदावली..

आपापल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखलभागांची पाहणी करावी, असे निर्देश संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास तातडीच्या उपाययोजना कराव्या, पाणी उपसा करणारे पंप चालू स्थितीत आहेत की नाही याची खातरजमा करावी. सब-वेची पाहणी करावी, असेही निर्देश आयुक्तानी दिले आहेत. तसेच मुंबईतील विविध भागात आपण अचानक पाहणी करणार आहे, असा इशारा आयुक्तानी दिला आहे. दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याच्या पार्श्वभूमीवर चहल बुधवारी वांद्रे – कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावर,  वाकोला लहान उदंचन केंद्र, धारावी टी जंक्शन, गांधी मार्केट, हिंदमाता येथे केलेल्या उपाययोजनांची पाहणी करणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next four five days of heavy rain municipal commissioner instructs officers mumbai print news ysh