मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) ‘आयसिस’ महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात गुरूवारी सहा आरोपींविरोधात चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. एनआयएने ठाणे, पुणे परिसरात छापा टाकून अटक केलेल्या सहा आरोपांविरोधात आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी इलेकट्रॉनिक वस्तू व आयसिसशी संबंधीत कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘मार्ड’च्या संपामुळे जे.जे. रुग्णालयातील डॉ. महेंद्र कुरा यांची अखेर बदली

ताबिश सिद्दीकी, झुल्फिकार अली, शरजील शेख आणि आकीफ अतीक नाचन, झुबेर शेख आणि अदनान अली सरकार या आरोपींविरोधात विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. चार हजार पानांच्या आरोपपत्रात १६ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष आहे. सहा प्रतिबंधित आयएसआयएस संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप आहे. त्यांनी लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि भारताची सुरक्षा, धर्मनिरपेक्ष आचारसंहिता आणि संस्कृतीला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या आणखी दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे आयसिसद्वारा प्रकाशित ‘व्हॉइस ऑफ हिंद’ आणि ‘व्हॉईस ऑफ खुरासान’ सारख्या प्रचार नियतकालिकांसह सीरियाला ‘हिजरा’शी संबंधित दस्तावेज सापडले होते. दहशतवादी योजना आखणे, त्यासाठी अर्थसहाय्य मिळवणे असे विविध कामे करत होते. एनआयएने २८ जून २०२३ ला सहा आरोपींंविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कालवाधीत कोंढवा परिसरात ‘एनआयए’ने छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉ. अदनानली सरकार (वय ४३) याला अटक केली होती. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ‘आयसिस’शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात उघड झाली होती. डॉ. अदनान अली हडपसर भागातील एका नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ आहे. पंधरा वर्षांपासून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्याने पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ‘एनआयए’ने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला व आकीफ आतिक नाचन यांना अटक केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia files 4000 page chargesheet against six accused in isis module case mumbai print news zws