एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घऱी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला आहे, सकाळी सहा वाजता एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. उद्योगपती अंबानी धमकी प्रकरण तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.
Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma. Details awaited.#Maharashtra pic.twitter.com/s6dO1WMh6T
— ANI (@ANI) June 17, 2021
शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.
अंबानी धमकी प्रकरणात प्रदीप शर्मा यांची चौकशी
निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.
आणखी वाचा- हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?
शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.