मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधित प्रकरणांमध्ये राष्ट्रीय तपास पथकाने बुधवारी मुंबई, ठाण्यासह देशभरातील २० ठिकाणी छापे घातले. महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये ‘एनआयए’ने कारवाई केली. विक्रोळीतील अब्दुल वाहिद शेख याच्या घरी ‘एनआयए’ने पहाटे छापा घातला. शेखने घराचा दरवाजा न उघडल्यामुळे ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना सहा तास घराबाहेरच प्रतीक्षा करावी लागली. अखेर ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी शेखच्या घरात दाखल होऊन चौकशी केली. यावेळी स्थानिक पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा >>> मुंबई: आंतरराष्ट्रीय कंपनीची १६ कोटी रुपयांची फसवणूक; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
mumbai police (1)
पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही; विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्याचे ७ कोटी मात्र थकित!
Extension of admission process for nursing courses Mumbai news
परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ; ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश
FDA raided establishments for adulteration seizing food stock worth Rs 311 crore
दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३ कोटी ११ लाखांचा माल जप्त
commission ordered transfers of 222 police officers from Mumbai Navi Mumbai and Mira Bhayander
भाईंदर, वसईतील ३६ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, १९ पोलीस ठाण्यातील १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले
Nashik Rural Police cracking down on illegal businesses ahead of assembly elections
जिल्ह्यात दोन दिवसात ३३ संशयितांविरुध्द गुन्हे, अवैध व्यवसायांविरुध्द पोलिसांची कारवाई

शेख एक संस्था चालवतो. त्याचा ‘पीएफआय’शी संबंध असल्याचा संशय आहे. ‘एनआयए’ने मुंबई आणि ठाणे अशा दोन ठिकाणी छापे घातले. विक्रोळी येथील अब्दुल वाहिद शेखच्या विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील निवासस्थाना व्यतिरिक्त, ‘एनआयए’च्या पथकाने भिवंडी, मुंब्रा आणि महाराष्ट्रातील इतर विविध जिल्ह्यांमध्येही शोध मोहीम राबवली. ‘पीएफआय’वर देशभरात कारवाई करण्यात आल्यानंतर नव्या नावाने आणि नव्या सदस्यांसह ‘पीएफआय’ची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. नवीन नावाने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे कार्य सुरू असून, त्यासाठी गुप्तपणे निधीही जमा केला जात असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारावर अनेक संशयितांची चौकशीही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आपल्याला कोणतीही कागदपत्रे दाखवण्यात आलेली नसल्याचा आरोप शेखने समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित करून केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि आयुक्तांकडे तक्रार केल्याचेही शेखने म्हटले आहे. ७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात शेख संशयित होता. परंतु, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ११ जुलै २००६ ला मुंबईतील लोकलमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात १८७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. दुसरा छापा ठाण्यातील राबोडी परिसरात टाकण्यात आला. सिमी या प्रतिबंधित संघटनेच्या माजी सदस्याच्या घरी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी एनआयएने संशयिताच्या घरी शोध मोहीम राबवली. त्याला ‘एनआयए’च्या लखनऊ येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आपला ‘पीएफआय’ संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचे त्याने चौकशीत सांगितले.