नायगाव येथे सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी शुक्रवार ते रविवार वसई रोड ते भाईंदर दरम्यान जलद मार्गावर दोन्ही दिशेने रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात रात्री ११.५५ ते पहाटे ६.२५ पर्यंत काही उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून सर्व वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवार ८ आणि शनिवार ९ मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ५.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात वसई-बोरिवली (रा. ११.२०), बोरिवली-विरार (रा. ११.५५), १५ डब्यांची बोरिवली-विरार (पहाटे ४.४०) आणि १५ डब्यांची विरार-अंधेरी (पहाटे ५.३०) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटहून शुक्रवारी रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.
शनिवार ९ आणि रविवार १० मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ६.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात वसई-अंधेरी (रा. १०.१०), अंधेरी-विरार (रा. ११.१५), वसई-बोरिवली (रा. ११.२०) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरीहून वसईसाठी शनिवारी रात्री ९.५० वाजता सुटणारी तसेच चर्चगेटहून रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.
रविवार १० आणि सोमवार ११ मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे.
या काळात वसई-बोरिवली (रा. ११.२०) आणि बोरिवली-विरार (रा. ११.५५) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटहून रविवारी रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा