मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामानिमित्त शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक कालावधीत भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
शुक्रवारी ब्लॉक कालावधी मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर – सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा – सीएसएमटी मेल दादर स्थानकात स्थगित करण्यात येतील. तर, रात्री ९.५४ सीएसएमटी – कल्याण आणि रात्री ११.०५ कल्याण – सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहे.
हेही वाचा…राज ठाकरे यांची शुक्रवारी १० मे रोजी सभा
शनिवारी ब्लॉक कालावधीत हावडा – सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मऊ – सीएसएमटी विशेष, मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, अमृतसर – सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, नागपूर – सीएसएमटी सुपरफास्ट स्पेशल, हावडा – सीएसएमटी मेल दादर स्थानकात स्थगित करण्यात येतील. तर, ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसेल.
ब्लॉकपूर्वी रात्री १२.१४ वाजता सीएसएमटी – कसारा दरम्यान शेवटची लोकल धावेल. तर, ब्लॉकनंतर पहाटे ४.४७ वाजता सीएसएमटी – कर्जत दरम्यान पहिली लोकल सुटेल. ब्लॉकपूर्वी रात्री १०.३४ वाजता कल्याण-सीएसएमटी दरम्यान शेवटची लोकल धावेल. ब्लॉकनंतर पहाटे ४ वाजता ठाणे – सीएसएमटी दरम्यान पहिली लोकल सुटेल.
हेही वाचा…मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण
ब्लॉकपूर्वी रात्री १२.१३ वाजता सीएसएमटी-पनवेल दरम्यान शेवटची लोकल धावेल. तर, ब्लॉकनंतर पहाटे ४.५२ वाजता सीएसएमटी-पनवेल दरम्यान पहिली लोकल सुटेल. ब्लॉकपूर्वी रात्री १०.४६ वाजता पनवेल-सीएसएमटी दरम्यान शेवटची लोकल धावेल. ब्लॉकनंतर पहाटे ४.१७ वाजता वांद्रे-सीएसएमटी दरम्यान पहिली लोकल सुटेल.